Wakad : अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करा, पण सूडबुद्धीने नको – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून अनधिकृत बांधकामे, पत्राशेड होणे चांगले नाहीत. त्याकरिता अनधिकृत बांधकामावर सरसकट कायदेशीर करवाई करावी. पण, सूडबुद्धीने कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली. दरम्यान, वाकड परिसरात सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी (दि.2) वाकड दत्त मंदिर रोड या ठिकाणी अतिक्रमण कारवाई केली. यामध्ये केवळ बाळकृष्ण कलाटे आणि अजय कलाटे या दोघांच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना अशा सर्व प्रकारच्या पत्राशेडवर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु, वरील दोनच ठिकाणी कारवाई करण्यात आली. हे योग्य नाही. यामुळे सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या दृष्टिकोनातून अनधिकृत बांधकामे, पत्राशेड होणे चांगले नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर सरसकट कायदेशीरपणे कारवाई करणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम कलम 1966 नुसार नोटीस देऊन कारवाई केली जाते. ही कारवाई सर्व नोटीस दिलेल्या अतिक्रमणावर होणे अपेक्षित होते. परंतु, केवळ दोनच पत्राशेडवर कारवाई का? करण्यात आली. त्या कारवाईच्या बाजूलाच आपण नोटीस दिलेले अनधिकृत शेड आहे. त्याकडे का दुर्लक्ष करण्यात आले. आजची कारवाई कोणत्या अधिका-याच्या अधिपत्याखाली करण्यात आली. पोलीस बंदोबस्ताची लेखी मागणी कधी करण्यात आली होती. त्याबाद्दल सविस्तर माहिती कलाटे यांनी निवेदनाद्वारे मागविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.