Chinchwad : राहुल कलाटे जाणार शिंदे यांच्या शिवसेनेत?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे (Chinchwad ) हे आपल्या समर्थक नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज (सोमवारी) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल असे सांगितले जाते. खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Talegaon : भानू खळदेची येरवडा कारागृहात रवानगी

राहुल कलाटे 2017 मध्ये पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून आले होते. शिवसेनेचे गटनेते, सलग दोनवर्षे स्थायी समितीचे सदस्य होते. शिवसेनेचे शहरप्रमुख पद देखील भूषविले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तीनवेळा निवडणूक लढविली. 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवत दुस-या क्रमाकांची मते घेतली.“

2019 मध्ये बंडखोरी करत राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत लाखाच्या पुढे मते घेतली.

त्यानंतर भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत कलाटे यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी केली.

या निवडणुकीत कलाटे यांचा पराभव झाला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.