Talegaon : मोबाईलच्या दुकानातून लॅपटॉपसह 16 मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज – मोबाईलचे दुकानात फोडून दुकानातून एक लॅपटॉप आणि 16 मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 2) सकाळी दहाच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे उघडकीस आली.

राकेश बाबुलाल परिहार (वय 25, रा. सोमाटणे फाटा) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश यांचे सोमाटणे फाटा येथे मोबाईल फोनचे दुकान आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी त्यांचे दुकानात कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून एक लॅपटॉप व 16 मोबाईल फोन असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.