Talegaon Crime News : पेट्रोल टाकून रिक्षाचा टप जाळला

एमपीसी न्यूज – पेट्रोल टाकून अज्ञातांनी रिक्षाचा टप जाळला. बेबडओहोळ ( ता. मावळ) याठिकाणी रविवारी (दि. 07) पहाटे चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी विनोद रमेश गायकवाड (वय 34, रा. बेबडओहोळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची एम एच 14 एच एम 6455 या रिक्षाच्या टपावर अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळला. रिक्षा चालकाचे यामध्ये पाच हजाराचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार जगदाळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.