Gutkha seized : तळेगाव दाभाडे येथून 1.99 लाख रुपयांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथे 1.99 लाख रुपयांचा गुटखा (Gutkha seized) जप्त करण्यात आला आहे. त्यासोबतच चार चाकी गाडी व इतर साहित्य असा एकूण 5.61 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संतोष कटके, वय 42 वर्षे, रा. तळेगाव  दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, शिवाजी दरेकर रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे व हनुमंत, रा. खालुंब्रे, तालुका खेड, जिल्हा पुणे या अर्पण विरोधात भा.द.वि कलम 328, 272, 273, 188, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटके व दरेकर या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

PCMC News: सहाय्यक आयुक्त खांडेकर यांच्याकडील प्रशासन काढले, उपायुक्त जोशी यांची ‘पॉवर’ वाढली

 

ही कारवाई बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.40 वा चे सुमारास कासारसाई पुसाणे रोडने पाचाने गावच्या हद्दीत मल्हार पोझिशन सोर्स जवळ ही कारवाई करण्यात आली होती. तिन्ही आरोपींनी संगणमताने शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनाने मुखाचे कर्करोग व इतर विकार होऊन शारीरिक आणि होऊ शकते हे माहित असताना देखील 1,99,060 रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा विक्री करण्याच्या हेतूने पोत्यामध्ये भरून 3.50 लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या चार चाकी गाडीत आणला होता.(Gutkha seized) त्या गाडीत 500 रुपये किंमतीचा साधा मोबाईल व 8,000  रुपये किंमतीचे साहित्य गाडीत होते. पोलिसांनी असा एकूण 5,61,410 रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी संतोष कटके यांनी घेऊन आला असताना व तो आरोपी शिवाजी दरेकर कडे मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.