Talegaon Dabhade : आधार कार्ड अपडेट कॅम्पमध्ये 300 नागरिकांनी केले आधार अपडेट

माजी नगरसेवक निखिल भगत यांच्यातर्फे कॅम्पचे आयोजन

एमपीसी न्यूज – आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील तर (Talegaon Dabhade) असे आधार कार्ड नव्याने अपडेट करणे बंधनकारक झाले आहे. आधार अपडेट न केल्यास ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी नगरसेवक निखिल भगत यांनी स्व खर्चाने यशवंतनगरमध्ये दोन दिवसीय आधार कार्ड अपडेट कॅम्पचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल 300 नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घेतले.

 

जनसेवा विकास समितीचे माजी नगरसेवक निखिल भगत यांच्या वतीने यशवंत नगर व तपोधाम कॉलनीमधील सर्व नागरिकांसाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत आधार कार्ड अपडेट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक निखिल भगत म्हणाले,  आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक बदलतात, आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर 10 वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक करण्यात आले आहे.

तसेच आधार अपडेट न केल्यास ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड काढून 10 वर्षे झालेल्या प्रभागातील नागरिकांचे आधार रद्द होऊन त्याची भविष्यकाळातील गैरसोय टाळावी, यासाठी  प्रभागातील (Talegaon Dabhade) नागरिकांसाठी स्वखर्चाने दोन दिवस आधार कार्ड अपडेट कॅम्पचे आयोजन केले होते. या शिबिरात 300 नागरिकांनी सहभाग घेत आधार कार्ड अपडेट करून घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.