Talegaon Dabhade : अनापा वाको किकबॉक्सिंग डायमंड वर्ल्डकप स्पर्धेत किशोर दाभाडे कांस्यपदकाचे मानकरी

एमपीसी न्यूज- रशिया येथे झालेल्या अनापा वाको किकबॉक्सिंग डायमंड वर्ल्डकप स्पर्धेत माळवाडी गावातील दाभाडे मार्शल आर्ट्सचे किशोर अंबरनाथ दाभाडे यांनी कांस्यपदक मिळविले. त्यांनी मिळविलेल्या यशाचे मावळ तालुक्यातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दाभाडे यांनी याआधी ४ वेळा राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक, एकदा राष्ट्रीय प्रो किक बॉक्सिंग टायटल बेल्ट आणि एकदा राज्यस्तरीय प्रो किक बॉक्सिंग मध्ये महाराष्ट्र टायटल पदक, वुशुमध्ये राज्य स्तरावर सिल्वर मेडल, थाईबॉक्सिंगमध्ये आशियाई सुवर्णपदक त्यांनी मिळविले आहे.

दाभाडे हे माळवाडी गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले एक खेळाडू असल्याने सर्व ठिकाणी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांना लहानपणापासून मार्शल आर्टस् खेळाची आवड असल्याने त्यांनी यामध्ये चांगली आवड निर्माण केली पुढे त्यांना या खेळाविषयी कोटेश्वरवाडी येथील सुभाष दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांनी आपल्याला मिळालेल्या या यशामागे आई वडील आणि सुभाष दाभाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले.  या पुढे होणाऱ्या या डायमंड स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.