Talegaon Dabhade : बनावट चावीने दरवाजा उघडून भरदिवसा दोन लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज – बनावट चावीच्या सहाय्याने घराचे कुलूप उघडून घरातून दोन लाख 13 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले. ही घटना पियुष अपार्टमेंट तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. 6) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

सुरेखा बबन खोल्लम (वय 61, रा. पियुष अपार्टमेंट, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा यांचे पियुष अपार्टमेंट येथे रो हाऊस आहे. सोमवारी दुपारी अडीच ते सायंकाळी पावणेसात या कालावधीत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात आरोपीने बनावट चावीच्या सहाय्याने घराचे कुलूप उघडले. 104 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरी करून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.