Talegaon : तळेगाव मधील श्रीमंत घरावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील एका श्रीमंत घरावर दरोडा (Talegaon) घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घोरावडी रेल्वे स्टेशन जवळ करण्यात आली.

राज उर्फ बारक्या प्रमोद साठे (वय 19, रा . तळेगाव दाभाडे), शाहरुख उर्फ चिन्या दिलावत शेख (वय 19, रा. तळेगाव दाभाडे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या इतर तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pimpri : 50 वर्षीय रुग्णाच्या पायातून काढली 25 सेंटीमीटरची गाठ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज आणि शाहरुख हे त्यांच्या इतर साथीदारांसोबत घोरावाडी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत झुडपाच्या आडोशाला थांबले होते. त्यांच्या हालचाली संदिग्ध दिसल्याने तळेगाव दाभाडे (Talegaon) पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्टल, कोयता, लाकडी दांडके, मिरची पावडर, दोरी असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी पाचही जणांकडे चौकशी केली असता ते तळेगाव दाभाडे येथील एखाद्या श्रीमंत घरावर दरोडा घालण्याची तयारी करत असल्याचे समजले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.