Pimpri : 50 वर्षीय रुग्णाच्या पायातून काढली 25 सेंटीमीटरची गाठ

एमपीसी न्यूज- पिंपरीच्या डीपीयू खासगी सुपर स्पेशालिटी (Pimpri)रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका 50 वर्षीय व्यक्तीच्या पायातील 25 सेंटीमीटर आकाराची गाठ काढली. गाठ काढल्याने रुग्णाला जीवदान मिळाले.

रघुनाथ गावडे (नाव बदलले आहे) या रिक्षा चालकाच्या पायातून गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. ते पुण्यातील रहिवाशी आहेत. डाव्या पायाला मोठ्या आकाराची गाठ आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांना सातत्याने वेदना होत होत्या. तसेच (Pimpri)चालताना किंवा उभे राहिल्यानंतर त्यांना वेदना वाढत होत्या. त्यामुळे जादा वेळ ते उभे राहू शकत नव्हते. परिणामी, त्यांच्या पायाला सूज येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना 23 नोव्हेंबरला डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Hinjawadi : हिंजवडी मधील ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीतील गॅस भट्टीमध्ये स्फोट; 20 कामगार जखमी

गावडे यांची वैद्यकीय तपासणी सुरु असताना त्यांना या वेदना सुमारे सहा महिन्यापासून होत असल्याचे निदर्शनास आले. वेदना असहाय्य झाल्याने त्यांच्या दैनंदिन कामावर परिणाम होऊ लागला, त्यावेळी त्यांनी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय़ घेतला. इतर अनेक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कर्करोग असल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदविले त्यानुसार त्यांचा पाय गमावण्याची शक्यता ही वर्तवली.

पायातील गाठीने त्यांच्या मज्जातंतूना व्यापले होते. त्यामुळे त्यांचा पाय वाचविण्याची शक्यता कमीच होती. सर्व आवश्यक तपासणी केल्यानंतर कर्करोग नसल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

10 नोव्हेंबरला कर्करोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चंद्रा आणि कर्करोग शल्यचिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ. समीर गुप्ता यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविली. या शस्त्रक्रिये दरम्यान, पायांच्या स्नायूंना पुरवठा करणाऱ्या मज्जातंतूंना वाचविण्यास त्यांनी प्राधान्य दिले.

मज्जातंतूंचे नुकसान झाले असता त्यांना कायमचा अर्धांगवायू येऊन अपंगत्व आले असते. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीन तासांहून अधिक कालावधी लागला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाला. त्याला चालता येणे शक्य झाल्याने सात दिवसांच्याउपचारानंतर गावडे यांना घरी सोडण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.