Pimpri : माजी महापौर संजोग वाघेरे शनिवारी बांधणार शिवबंधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे (Pimpri)शनिवारी (दि.30) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करणार आहेत.

वाघेरे यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री गाठली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यांच्यासोबत राज्य संघटक एकनाथ पवार, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार उपस्थित होते.

Talegaon : स्व.दिगंबर भेगडे यांचे जीवन कर्तव्याप्रती समर्पणाचा आदर्श – देवेंद्र फडणवीस

सदिच्छा भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वाघेरे म्हणाले(Pimpri) होते की, ठाकरे यांची भेट घेऊन लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यांनी चर्चा करुन दोन दिवसात सांगतो असे सांगितले होते. अखेरीस वाघेरे यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला.

सदिच्छा भेटीनंतर वाघेरे यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता. त्यावर शिक्कामोर्तब झाले असून वाघेरे शनिवारी शिवबंधनात अडकणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.