Talegaon Dabhade : विरोधात तक्रार केली म्हणून घरातील सामान केले जाळून खाक

एमपीसी न्यूज – विरोधात तक्रार दिली म्हणून थेट घरातील (Talegaon Dabhade)समान जाळून खाक कऱण्यात आले आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील चावडी चौक परिसरात शनिवारी (दि.23) सायंकाळी घडली आहे.

याप्रकरणी संजय रमेश बावीसकर (वय 43 रा.तळेगाव दाभाडे) यांनी (Talegaon Dabhade)तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अजय बाळकृष्ण पिंपळे (रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : नृत्याविष्कारातून 600 मुलांनी तब्बल तीन तास साकारले गीत रामायण!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विरोधात तक्रार केली याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी हे घरात नसताना घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. आरोपीने घरातील गिझर व गॅस सिलेंडर चोरून नेले व घरातील इतर सामानाला आग लावली.

या आगीत घरातील फर्निचर, सोफा भिंती जळून खाक झाल्या आहेत.या घटनेत फिर्यादी यांचे 8 लाख रुपयांचे साहित्य जळाले असून 4 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस, पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.