Chakan : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पायी जाणाऱ्या नागरिकाचा एका वाहनाच्या (Chakan) धडकेत मृत्यू झाला.  हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजता चाकण शिक्रापूर रोडवर घडला आहे. चंदू पांडुरंग शेळके (वय 50, रा. शिरूर) असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी सयाजी वसंतराव गाडेकर (वय 52, रा. भोसे खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सुखमित कौर (पूर्ण पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : विरोधात तक्रार केली म्हणून घरातील सामान केले जाळून खाक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके हे पायी रोड वरून जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील (Chakan) वाहन बेदरकारपणे वेगात चालवून शेळके यांना धडक दिली. या धडकेमध्ये शेळके यांच्या छातीला व हाताला गंभीर जखम झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.