Pune : नृत्याविष्कारातून 600 मुलांनी तब्बल तीन तास साकारले गीत रामायण!

एमपीसी न्यूज – डीईएसच्या पूर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदीर शाळेतील सहाशे विद्यार्थ्यांनी सलग तीन तास (Pune) नृत्याविष्कारातून गीतरामायण सादर केले. लहान वयात मोठ्या संख्येने गीत रामायण सादर केल्याबद्दल ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ असे दोन विक्रम शाळेने प्रस्थापित केले.

राम जन्म, सीता स्वयंवर, हनुमान भेट, रावण वध असे 30 प्रसंग नृत्य, संगीत आणि नाटकाच्या माध्यमांतून अडीच ते साडेपाच वयोगटातील विद्यार्थ्यांनी चार हजार प्रेक्षकांसमोर साकारले.

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गीतरामायणाचे जनक ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांच्या सादरीकरणातून श्रोते मंत्रमुग्ध झाले.

Talegaon : प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

आनंद माडगुळकर आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी (Pune) आणि शाला समितीच्या अध्यक्ष ॲड. राजश्री ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.