Talegaon Dabhade : पावसाळापूर्व कामांचा मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज – पावसाळापूर्वकामांचा मुख्याधिकारी एन के पाटील यांनी (Talegaon Dabhade) आढावा घेतला. या आढावा बैठकीत स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता विभाग प्रमुख, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, विद्युत विभागप्रमुख आणि उद्यान विभाग प्रमुखांना तयारीबाबत मुख्याधिकाऱ्यांनी निर्देश दिले. पावसाळ्यापूर्वी आवश्यक सर्व कामे करून घेण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

(दि 17) रोजी या बैठकीचे आयोजन नगर परिषद कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी नगर परिषदेतील विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढील सुचना कारण्यात आल्या.  शहरातील मोकळ्या जागा, तळे किनारी,टेकड्या,रस्ते दुतर्फा इत्यादी ठिकाणी वृक्षलागवड करण्याचे नियोजन करणे, विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे,तुंबलेली गटारे,  रस्त्यामधील खाच-खळगे, मोकळ्या जागेत तुंबणारे सांडपाणी त्यावर निर्माण होणारे डास, शहरात लावण्यात आलेली अनधिकृत बॅनर व नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून टाकणे.

तसेच नगरपरिषदेद्वारे स्थापित प्लास्टिक निर्मूलन पथकाद्वारे अचानक धाडी टाकून कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करणे, घरातून अथवा संस्थेतून निर्माण होणारा ओला -सुका कचरा विलगीकरण करून नगरपरिषदेच्या घंटागाडीमध्ये सुपूर्द करणे,शहरातील भुयारी गटार तथा रस्ते दुरुस्तीची कामे यामुळे वाहतुकीस अडथळा तथा नागरिकांना त्रास होत असल्याने सदरची कामे तात्काळ पूर्ण करून  घेणे,श्रमदानातून वृक्षलागवड, स्वच्छता अभियान जनजागृती रॅली यासारखे उपक्रम सर्व शाळांचे विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी शहरातील सामाजिक संस्था, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग घेऊन राबविणे.

IPL 2023-विराट कोहलीच्या शतकी खेळीने आरसीबीला विजयासह मिळाले अंकतालिकेत चौथे स्थान.आज

नागरिकांनी नगरपरिषदेस दिलेल्या तक्रार/अर्जाच्या अनुषंगाने नगरपरिषद कार्यालयास वारंवार येण्याची आवश्यकता भासणार नाही, यापद्धतीने शासन नियमानुसार कामांचे नियोजन करून नागरिकांना विहित वेळेत सुविधा उपलब्ध करून देणेबाबत सक्त सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या. हिंदमाता भुयारी मार्ग येथे पाणी साचून रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पूर्वनियोजन करणे,नगरपरिषदेतील सर्व विभागप्रमुख यांनी अनावश्यक खर्च टाळून व काटकसर करून शहराचे विकासासाठी कुटुंबातील एक सदस्य समजून आपली जबाबदारी पार पाडावी. असे आवाहन केले.

नगरपरिषदेची इमारत व नगरपरिषदेच्या मालकीची  शासकीय ठिकाणे या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणेबाबत कार्यवाही करणे, विद्युत प्रवाह नसल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून मुबलक डिझेलसह जनरेटर सेटचे नियोजन करणे आदी सुचना करून पुढील 1-2 वर्षाच्या कालावधीत शहर सौंदर्यीकरण, वृक्षलागवड, स्वच्छता अभियान यांची प्रभावी अंमलबजावणी करून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा मानस मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला.

सकाळी 6 वाजता केला पहाणी दौरा
 मा.मुख्याधिकारी श्री.एन.के.पाटील यांनी सकाळी 6 वाजता शहराचा पाहणी दौरा केला. सदर पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांना दिसून आलेल्या या सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना आढावा बैठकीत (Talegaon Dabhade) दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.