Talegaon Dabhade : स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत तलाव परिसरातील चार टन कचऱ्याचे संकलन

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मंडळ व तळेगाव दाभाडे नगरपरिषद (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल – स्वच्छ मन” या उपक्रमांतर्गत गाव तळे परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वयंसेवकांनी दोन तासात तब्बल चार टन कचरा संकलित करून तो कचरा डेपोमध्ये पाठवून दिला.

संत निरंकारी मंडळ व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल –स्वच्छ मन” या उपक्रमानिमित्त मुख्याधिकारी एन. के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे शहरातील गाव तळे लागत असणा-या परिसराची स्वच्छता करून घेण्यात आली. याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अभिषेक शिंदे,शहर समन्वयक गीतांजलीहोनमने, स्वच्छता सुपरवायझर व संत निरंकारी मंडळ यांचे असणारे एकूण 50 सदस्य उपस्थित होते.

Talegaon Dabhade : नगरपरिषदेत संत गाडगेबाबा जयंती साजरी

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सद्गुरु सुदीक्षा माताजींच्या कृपा आशीर्वादानुसार अमृत जल स्वच्छताची अंमलबजावणी (Talegaon Dabhade) करणेसाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी शहर समन्वयक गीतांजली होनमने यांनी स्वच्छतेचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्व सर्व उपस्थिताना सांगितले.त्याप्रमाणे सर्व मंडळ सदस्य व न. प.अधिकारी व सुपरवायझर यांनी सकाळी 8 ते 10 दरम्यान गाव तळे परिसरात श्रमदान केले व सुमारे 4 टन इतका कचरा संकलित केला व संकलित केलेला कचरा नगरपरिषदेच्या ट्रॅक्टर मध्ये भरून कचरा डेपो येथे पाठविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.