Talegaon Dabhade : रोटरी सिटीचा सामुदायिक विवाह सोहळा 28 एप्रिल रोजी

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व आमदार सुनिल शंकरराव शेळके फाउंडेशन (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. 28 एप्रिल) रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. मंगळवारी (दि. 13) गणेश जयंतीचे औचित्य साधून तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, अध्यक्ष सुरेश शेंडे, संस्थापक अध्यक्ष‌, प्रकल्प प्रमुख विलास काळोखे व रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ वाढवून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

मावळ तालुका व पंचक्रोशीतील गरजू व गोरगरिबांच्या मुला मुलींचे अतिशय चांगल्या पद्धतीने लग्न लावून त्यांना संसार उपयोगी वस्तू देऊन हा सोहळा थाटामाटात करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले तसेच आपण रोटरी सिटीच्या सदैव पाठीशी आहोत असे सांगताना हा सोहळा थाटामाटात करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

तर गेली पाच वर्ष सामुदायिक विवाह हा उपक्रम राबवताना समाजातील (Talegaon Dabhade) गरजू व गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे काम रोटरी सिटी करत आहे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी प्रास्ताविकाद्वारे करताना रोटरी सिटीच्या सामाजिक,शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांची माहिती विशद केली.

Maharashtra : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

रोटरी सिटी व आमदार सुनिल शंकरराव शेळके फाउंडेशन यांच्या वतीने संपन्न होणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्न लावली जाणार आहेत. भव्य लग्न मंडप वऱ्हाडी मंडळींना व नागरिकांना नाश्ता व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वधू-वरांना साखरपुडा, हळदी व लग्नाचे पोशाख, झाल झेंडा, गॅस शेगडी, शिलाई मशीन, सिलिंग फॅन, भिंतीवरील घड्याळ, गोदरेज कपाट, प्रत्येक वधूस सोन्याची नथ,तीन भाग्यवान विजेत्या वधूवरांना मोबाईल,भाग्यवान वधूवरास एक गीर गाई व वासरू इत्यादी वस्तू देण्याचे दोन्ही संस्थांनी ठरविले आहे. हा विवाह सोहळा थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळेत संपन्न होणार असून तळेगाव शहरातून नवरदेवांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे अगोदरच्या दिवशी मांडव टहाळा व टॉवेल टोपीचा पारंपारिक कार्यक्रम घेतला जाणार आहे.

मावळ पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त लग्न या विवाह सोहळ्यात आणावीत असे आवाहन रोटरी सिटी व फाउंडेशन ने केले आहे. उद्घाटनाच्या मुहूर्तावर रोटरी सिटी चे सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी रोटरी पदाधिकारी व आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ३ वधूवरांची विवाह नोंदणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश दाभाडे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष सुरेश शेंडे, उपाध्यक्ष किरण ओसवाल व सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी केले.

रो. दिलीप पारेख,रो.हरिश्चंद्र गडसिंग, रो.संजय मेहता,रो.सुरेश धोत्रे, रो.संतोष शेळके,रो.दादासाहेब उ-हे,रो.संजय वाघमारे,रो.संतोष परदेशी,रो.संजय चव्हाण,रो.विश्वास कदम,रो.प्रदीप टेकवडे,रो.रघुनाथ कश्यप,रो.तानाजी मराठे,रो.प्रशांत ताये,रो.राकेश ओसवाल,रो.रामनाथ कलावडे,रो.सुनंदा वाघमारे, रो.बाळासाहेब रिकामे,रो.डाॅ.सौरभ मेहता,रो.बसाप्पा‌ भंडारी,रो.प्रसाद बानगुडे,रो.मनोज नायडू इ.नी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न (Talegaon Dabhade) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.