Google Doodle : व्हॅलेंटाईन डे निमित्त गुगलचे खास डुडल; केमिस्ट्री क्युपिड गेम खेळून बनवा मूलद्रव्यांशी बाँडिंग

एमपीसी न्यूज – व्हॅलेंटाईन डे निमित्त गुगलने खास डुडल सादर ( Google Doodle ) केले आहे. यावर्षी गुगलने ‘केमिस्ट्री क्युपिड’ हा खेळ आणला असून या खेळातून मूलद्रव्यांशी बाँडिंग करण्याचा आनंद घेता येत आहे. माहिती, मनोरंजन आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गुगलने हे डुडल सादर केले आहे.

गुगलच्या होम पेजवर गेल्यानंतर गुगल डुडलवर कलिकणकरवे लागेल. त्यानंतर केमिस्ट्री क्युपिड हा गेम सुरू होईल. केमिस्ट्री क्युपिड हा गेम खेळताना गुगलचे वापरकर्ते एक मूलद्रव्य असतात. त्यांना दुसऱ्या मूलद्रव्यांशी बाँडिंग करायचे असते.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीचा सामुदायिक विवाह सोहळा 28 एप्रिल रोजी

सुरुवातीला एक क्विझ खेळून आपण कोणते मूलद्रव्य आहोत हे पाहावं लागेल. त्यासाठी गुगलने अगदी सहज, सोपे प्रश्न विचारले आहेत. त्याखाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करून याची उत्तरे देता येतील. त्यानंतर आपण कोणते मूलद्रव्य आहोत, हे गुगल ठरवते.

आपण कोणते मूलद्रव्य आहोत हे निश्चित झाल्यानंतर गेमचा पुढचा भाग सुरू होतो. आपल्या मूलद्रव्याशी सुसंगत इतर मूलद्रव्य निवडावी लागतात. त्यामध्ये एखाद्या डेटिंग ॲपवर जसे लेफ्ट आणि राईट स्वॅप करावे लागते, अगदी त्याचप्रमाणे मूलद्रव्य मॅच करण्यासाठी लेफ्ट किंवा राईट स्वॅप करावे लागते.

एखादे मूलद्रव्य राईट स्वॅप केल्यानंतर त्याचे तुमच्या मूलद्रव्याशी बोर्डिंग केले जाते. दोन मूलद्रव्य एकत्र आल्यानंतर काय बनू शकते हे यातून समजते. असे 18 बॉण्ड्स बनवल्यानंतर आपल्याला गुगलकडून सरप्राइज मिळते. हा गेम अगदी मजेशीर ( Google Doodle) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.