Talegaon Dabhade : जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – जळालेल्या अवस्थेत 20 ते 25 वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी पावणेदहाच्या सुमारास इंदोरी चाकण रोडच्या बाजूला समोर आला.

मृतदेह आढळलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे 20 ते 25 वर्ष आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास इंदोरी-चाकण रोडवर अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह रस्त्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर पडलेला आढळला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. खुनाची शक्यता लक्षात घेत तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like