Talegaon Dabhade : डॉक्टर म्हणजे साक्षात देवाचे रूप – दीपक फल्ले

एमपीसी न्यूज – महिंद्रा ऑटो स्टील यांच्या सीएसआर (CSR) फंडामधून आरोग्य (Talegaon Dabhade)केंद्र तळेगाव दाभाडे येथे सहा सेमी फ्लोअर बेड हस्तांतरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात बोलताना रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी ‘डॉक्टर म्हणजे साक्षात देवाचे रूप’ असे गौरवोद्गार काढले.

याप्रसंगी महिंद्रा स्टील कंपनीचे प्रसाद पादिर, सुरेश शेंडे, अनिल धर्माधिकारी, भगवान शिंदे, डॉ. चौधरी, संजय मेहता, प्रशांत ताये, हर्षल पंडीत आदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : गुणवंत विद्यार्थी महाविद्यालयाचा आरसा- अनुराधा ओक

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रोटरी सिटीच्या वतीने विविध प्रकारची मदत वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाते, असे प्रतिपादन प्रकल्प प्रमुख रो. किरण ओसवाल यांनी केले.

याप्रसंगी रुग्ण कल्याण समितीवर नुकतीच निवड झालेले निलेश गराडे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. मनोज चौधरी यांनी रोटरी सिटीचे कौतुक करताना रोटरी सिटीच्या सदस्यांना फोन केला की त्वरित आम्हाला हवी ती मदत उपलब्ध होते. यासाठी रोटरी सिटीचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश ओसवाल,तानाजी मराठे, सुनंदा वाघमारे,रघुनाथ कश्यप,विश्वास कदम,बाळासाहेब रिकामे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले. डॉ धनश्री काळे यांनी आभार (Talegaon Dabhade) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.