Talegaon Dabhade : गुणवंत विद्यार्थी महाविद्यालयाचा आरसा- अनुराधा ओक

एमपीसी न्यूज –  स्वतःमधील क्षमतांना ओळखत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक संसाधनांचा वापर स्वतःच्या गुणवत्तापूर्ण व्यक्तीमत्वासाठी करावा. आजचे विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून खरे भाग्यवान आहेत. जग त्यांच्या मुठीत आहे. याचा सकारात्मक वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर घडवावे. गुणवंत विद्यार्थी हाच महाविद्यालयाचा आरसा आहे. असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या सचिव अनुराधा ओक यांनी (Talegaon Dabhade ) केले.

 

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील (कला,वाणिज्य,विज्ञान व तंत्रशिक्षण) यंदाच्या 12 वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित केलेल्या गौरव समारंभात त्या बोलत होत्या.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. यावेळी  संस्थेचे संचालक संदीप काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय आरोटे, शिक्षक, प्राध्यापक,पालक, विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Kalewadi : उधारी मागण्यासाठी गेलेल्या तिघांवर चाकूने वार

 

ओक पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी गुणांच्या मागे न पळता व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर द्यावा. इतर अनेक गोष्टीत प्राविण्य मिळवत विद्यार्थी आयुष्यात मोठी झेप घेऊ शकतो. आज गुणांची चढाओढ विद्यार्थ्यांच्या बालपणाला हिरावून घेते की, काय? असे चित्र समाजात निर्माण झाले आहे असे ओक यांनी यावेळी सांगितले.

 

कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे यांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

 

स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य  डॉ संभाजी मलघे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीचा उंचावत असलेला आलेख मांडला.

 

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व समजावून सांगत दहावी नंतर मिळालेला दोन वर्षाचा शैक्षणिक कालखंड हा विद्यार्थ्यांना आयुष्याचा पाया भक्कम करण्यास उपयुक्त असल्याचे मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती कण्हेरीकर व संदीप भोसले यांनी केले. डाॅ संजय आरोटे यांनी आभार (Talegaon Dabhade )  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.