Talegaon Dabhade : एटीएम कार्ड क्लोनिंग करून महिलेची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम कार्डचे क्लोनिंग करून महिलेच्या बँक खात्यावरून 20 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

जास्मिन जुबेर शेख (वय 30, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 5) सकाळी फिर्यादी शेख घरी काम करत असताना त्यांच्या मोबाईल फोनवर खात्यातून पाच हजार, त्यानंतर 10 हजार आणि काही वेळेनंतर आणखी पाच हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यामुळे शेख यांनी त्यांचे डेबिट कार्ड तपासले असता त्यांचे डेबिट कार्ड त्यांच्याकडे होते. मात्र, अज्ञात आरोपीने त्यांच्या कार्डचे क्लोनिंग करून बँक खात्यातून 20 हजार रुपये काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.