Talegaon Dabhade : कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयातील प्रणव शेलार, ध्रुव घर्डले प्रथम

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे व गुरुकुल कुस्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी (Talegaon Dabhade) कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा (12वी) विद्यार्थी प्रणव प्रल्हाद शेलार याने 79 किलो वजनी गटात तर विज्ञान शाखेचा (12वी) विद्यार्थी धृव शंकर घर्डले याने 86 किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

CKP Community : कायस्थांच्या एकविरा देवी उत्सवामुळे नवी प्रेरणा मिळाली- अर्जुन देशपांडे

जुन्नर येथे होणाऱ्या पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता या दोघांची निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ संभाजी मलघे, उपप्राचार्य  ए आर जाधव, शारिरीक शिक्षण संचालक प्रतिभा गाडेकर आदींनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.