Talegaon Dabhade : इंदुमती आबाजी दाभाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती आबाजी दाभाडे (वय 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सुदाम दाभाडे यांच्या त्या मातोश्री तर सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब दाभाडे यांच्या त्या चुलती होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता बनेश्वर वैकुंठ स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.