Talegaon Dabhade: कोमल बन्नतकर यंदाच्या ‘रोटरी सिटी 2020 मिसेस मावळ’च्या मानकरी

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयाच्या प्रांगणात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने तालुकास्तरीय “मिसेस मावळ” व रांगोळी, मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत यंदाचा ‘रोटरी सिटी 2020 मिसेस मावळ’ या किताबाच्या मानकरी तळेगाव स्टेशन येथील कोमल बन्नतकर या ठरल्या तर उपविजेतेपद विनया चांदगुडे व गुंजन शहा यांनी मिळविले.

मावळ तालुक्यातील विविध भागातून आलेल्या 1000 ते 1500 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळातील 100 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या तिनही स्पर्धा संपूर्ण दिवसभर चालल्या होत्या.

या स्पर्धेचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, मावळच्या सभापती निकिता घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे सहायक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव, डिस्ट्रीक्ट फर्स्ट लेडी पद्मजा देशमुख, ए. सी. घड्याळे, योगपुरूष प्रदीप निफाडकर, डाॅ दिपाली भंडारी, सिनेअभिनेत्री श्रुती पारकर, नगरसेविका व मान्यवर महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणा-या महिला अनुपमा खांडगे, उर्मिला छाजेड, स्वाती दाभाडे, ज्योती गिते, रजनी पाटकर, तृप्ती निंबळे आदींना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल- श्रीफळ देऊन ‘रोटरी सम्राज्ञी 2020’ या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

रांगोळी व मेहंदी स्पर्धेत विद्या काळोखे, स्मिता खुडे, मानसी हेंद्रे, मेधा कपोते, बबिता मुस्कवाड, अमृता लोहकरे, उज्वला दाभाडे आदींनी बक्षिसे प्राप्त केली.  संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैशाली भंडारे, वर्षा करंजे, शितल कदम यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रोटरी सिटीचे अध्यक्ष मनोज ढमाले यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख रेश्मा फडतरे, विजय कदम, सह प्रकल्प प्रमुख शाहीन शेख, वैशाली खळदे, शरयू देवळे यांनी केले असून विशेष सहकार्य अॅन्स सीमा ढमाले, कामिनी हळदे, सुनीता रिकामे, रजनी देसाई, शालिनी कडलक, मेघा भागवत, माधुरी शहा, सारिका बुटाला, अल्बा पारेख यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक विलास काळोखे, मनोज ढमाले, संतोष शेळके, राजेश गाडे पाटील, दिलीप पारेख, नितीन शहा, शशिकांत हळदे, दादासाहेब उऱ्हे, बाळासाहेब रिकामे, विश्वास कदम, नरसिंग बजाज, भगवान शिंदे, प्रदीप टेकवडे, सुनील महाजन, हरिश्चंद्र गडसिंग, सुरेश धोत्रे, दिपक फल्ले, विशाल सांगाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

ढमाले डेअरी, गोधाम विको व्हिलेज, सोलेस हायजेनिया प्रा. लि., अंबिका स्टोन क्रशर, काकडे स्टोन क्रशर, अमृतवेल आंबी, पारेख डिजिटल फोटो, मावळ मार्ट, आदर्श साडी सेंटर, अंबिका क्लाॅथ सेंटर, तन्वी इंजिनिअरींग, श्री बंटर प्रायजेस, वेदास इंटरनॅशनल आदींच्या सौजन्याने मिसेस मावळ 2020 रोटरी सिटी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.