Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदची भुयारी गटार योजना नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात भुयारी गटार खोदकामामुळे चौकात दूषित सांडपाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत भुयारी गटार करण्यासाठी रस्ते खोदले असुन जिजामाता चौकात खोदकाम केल्याने मोठ्याप्रमाणावर दूषित सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.

हा चौक वर्दळीचा असुन मोठया प्रमाणात वाहतूक व नागरिकांची गर्दी असते. हे दूषित सांडपाणी वाहनाच्या टायरामुळे उडून नागरिकांच्या अंगावर पडत आहे. या दूषित सांडपाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत आहे. दूषित सांडपाणी साचल्याने परिसरात मच्छर मोठ्याप्रमाणात झाले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील भुयारी गटार योजना नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. या योजनेमुळे जागोजागी रस्ते खोदल्याने शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून नागरिकांना कंबर दुःखीचे आजार बळावले आहेत.पावसामुळे खोदकाम केलेली माती गटारात साचल्याने गटारी तुंबल्या आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील खड्डेमय रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमा भेगडे, गोकुळ भेगडे, प्रणव भेगडे, अजिंक्य सातकर आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.