Talegaon Dabhade : नथुराम कुंडलिक भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नथुराम (पेंधाजी) कुंडलिक भेगडे (वय 81) यांचे आज (शनिवार) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आॅर्डन्स तळेगाव डेपो येथील ते निवृत्त स्टोअर किपर आॅफीसर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, भाऊ, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.

टाटा मोटर्स कंपनीचे गुणवंत कामगार संजय भेगडे व कान्होबा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष अजय भेगडे आणि आ. कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे कामशेत शाखा व्यवस्थापक विनय भेगडे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.