Talegaon Dabhade News : नगरपरिषद कर्मचारी संघटनेची कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी रवींद्र काळोखे यांची निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना पुणे विभाग यांचेकडून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून स्वागत कक्षप्रमुख रवींद्र भिकाजी काळोखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

राज्यस्तरीय सदस्य प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषद शाखेची नवनिर्वाचित कार्यकारणी निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष मुरलीधर टकले, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, कार्याध्यक्ष- प्रवीण माने, संघटक- प्रशांत गायकवाड, सल्लागार- भास्कर वाघमारे, हिरामण लांडे, अनिल इंगळे, सचिव- रोहित भोसले. सहसचिव- अश्विनी गरुड, प्रवीण यादव, अंकुश जाधव, खजिनदार- विलास वाघमारे, सहखजिनदार- प्रकाश मकवाना यांची निवड करण्यात आली.

सदर नवनिर्वाचित कार्यकारीणीस मान्यता दिल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य नगर परिषद पंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना पुणे विभागाचे अध्यक्ष अनिल पवार व सचिव सचिन तुबे यांच्याकडून प्राप्त झाल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र काळोखे यांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या कामकाजात पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.