Talegaon Dabhade News : इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ऑर्गनाइज्ड रिसर्च संस्थेचा ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण पुरस्कार’ प्रा. प्रसाद ढोरे यांना जाहीर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राध्यापक प्रसाद बबन ढोरे यांना भारत सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई यांच्याशी संलग्न असलेल्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ऑर्गनाइज्ड रिसर्च या संस्थेकडून दिला जाणारा ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 ऑक्टोबर रोजी सन 2021 च्या पुरस्काराची संस्थेकडून घोषणा करण्यात आली आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ऑर्गनाइज्ड रिसर्च या संस्थेचा हा पुरस्कार शैक्षणिक मूल्यमापन करून देण्यात आला असून यामध्ये प्राध्यापकाचा परिचय, सादर केलेले पेपर, शिक्षण क्षेत्रातील कामकाज, ज्या संस्थेत काम करत आहे त्या संस्थेचा शैक्षणिक आलेख याचे गुणात्मक आणि परिणात्मक परीक्षण करून हा पुरस्कार प्रसाद बबन ढोरे याना निश्चित केला.

‘मिळालेला सन्मान हा माझा नसून माझ्या जडणघडणीतील प्रत्येक व्यक्तीचा असून यामध्ये मी काम करत असलेल्या माझ्या संस्थेचा वाटा आहे. आगामी काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करून शैक्षणिकदृष्टया अनेक संशोधन करण्याचा मानस ढोरे यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर आदींनी या घवघवीत यशाबद्दल ढोरे यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.