Bhosari Fire News : भोसरी येथे आगीत किराणा दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज – भोसरी येथे एका किराणा दुकानाला बुधवारी (दि. 6) रात्री दहा वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत किराणा दुकान जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

खिवाराम चौधरी यांचे लक्ष्मीनगर, भोसरी-आळंदी रोड, भोसरी येथे किराणा दुकान आहे. बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि भोसरी उपकेंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले.

किराणा दुकानात सिलेंडर होता. अग्निशमन विभागाच्या जवानांनी सिलेंडर तात्काळ बाहेर काढले. वेळीच जवानांनी सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये दुकान पूर्णपणे जळाले आहे. सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान या आगीमुळे झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे म्हटले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.