Pimpri : पिंपरीत मुख्य अग्न‍िशमन केंद्र प्रबोधनी

एमपीसी न्यूज – मुख्य अग्न‍िशमन केंद्र प्रबोधनी इमारत पिंपरीत (Pimpri )उभारण्यात येणार आहे.  पिंपरी येथील सिटी सर्वे नंबर 6017/ 123, 6018/4 मध्ये सुमारे 6 एकर जागेवर साधारण 200 कोटी खर्चाचा प्रकल्प प्रस्तावित आहे.

 

या प्रकल्पात 22 अग्न‍िशमन वाहने, 1 केंद्रीय अग्न‍िशमन( Pimpri )कार्यालय, 1 अग्न‍िशमन संग्रहालय, 200 आसन क्षमतेचे सभागृह, 50 आसन क्षमतेचे दोन सेमिनार रुम आणि 100 कर्मचा-यांच्या राहण्यासाठी निवासस्थाने, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष व प्रशिक्षण केंद्र अशी सुसज्ज अग्न‍िशमन केंद्राची मध्यवर्ती इमारत बांधण्याचे नियोजित आहे.

Pimpri : शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प, 2911 कोटींचा खर्च
आकुर्डीतील हेडगेवार भवन, पिंपळे सौदागर, व च-होली या ठिकाणी विभागीय अग्न‍िशमन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. यामध्ये 4 ते 5 अग्न‍िशमन वाहने, निंयत्रण कक्ष, अधिकारी कार्यालय व 30 कर्मचा-यांचे निवास्थाने असतील. चोविसावाडी च-होली, दिघी, पुनावळे येथे नविन 3 उप अग्निशमन केंद्र उभारण्याचे कामकाज चालू करण्यात आले आहे.

 

तसेच रावेत येथे उप अग्न‍िशमन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. अग्निशमन विभागाचे कार्यरत 8 अग्न‍िशमन केंद्र असून, शासन निकषानूसार प्रत्येक 10 किलो मीटर परिघ क्षेत्रामध्ये एक अग्न‍िशमन केंद्र असणे आवश्यक आहे. पिंपळे सौदागर, रहाटणी व भोसरी येथील सरंक्षण मंत्रालयाची जागा तसेच दापोडी येथील जलसंपदा विभागाकडील जागा संपादित करून सदर ठिकाणी अग्न‍िशमन केंद्र उभारणे कामकाज प्रस्तावित करण्यात येणार आहे.

Pimpri : शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प, 2911 कोटींचा खर्च

नविन अत्याधुनिक साधन सामुग्री असलेले विविध प्रकारचे अग्निशमन वाहने खरेदी करणेत येत आहेत. त्यामध्ये 54 मीटर व 32 मीटर उंचीचे TTL Fire Vehicle, 70 मीटर उंचीचे Airel Ladder Platform fire Vehicle, फायर टेंडर, वॉटर कॅनन, अडव्हॉन्स रेस्क्यु व्हॅन, फोम टेंडर, बी.ए. व्हॅन, डीसीपी टेंडर, फ्लड रेस्क्यु व्हॅन अशी एकूण 18 वाहने खरेदी कार्यवाही करण्यात येणार आहेत. National Disaster Management Authority (NDMA) यांच्या निकषानुसार अग्निशमन विभागाचे अत्यावश्यक कामकाजाकरीता आवश्यक असलेले विविध 86 प्रकारचे अत्याधुनिक अग्निशमन व विमोचन साहित्य / उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.