PCMC : आयुक्तांना ‘चष्मा’ देण्याचा प्रयत्न; संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले

एमपीसी न्यूज – वाकडमधील तब्बल दीड हजार कोटी (PCMC)रुपयांच्या कथित टीडीआर घोटाळ्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेकडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गेल्या पंधरा दिवसांपासून  “बेमुदत साखळी उपोषण” करण्यात येत आहे.

 

परंतु, आयुक्तांना आंदोलन दिसावे त्यांनी या घोटाळ्यात सहभागी (PCMC)असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आयुक्तांना जाड भिंगाचा ‘चष्मा’ भेट देण्यासाठी गेलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने’ ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात आले.

दरम्यान वाकडमधील कथित टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड हे असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. त्यांच्यासह  इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोन महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू दखल घेतली न गेल्याने गेल्या दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘बेमुदत साखळी उपोषण” करण्यात येत आहे.

Pune: सरकारने गुंडा प्रमाणे भ्रष्ट अधिकारी व पोलिसांचीही परेड घ्यावी – प्रदीप नाईक

परंतू महापालिकेत ये-जा करणाऱ्या आयुक्तांना मात्र सदरील आंदोलन दिसत नसल्याने त्यांना आंदोलन दिसावे,आणि त्यांनी या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आयुक्तांना जाड भिंगाचा ‘चष्मा’ भेट देण्यात येईल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला होता.

आयुक्तांना जाड भिंगाचा ‘चष्मा’ भेट देण्यासाठी गेलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी अडवले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने’ ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात आले.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाची भेट घेत ‘या घोटाळ्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून, योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे, जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष ज्ञानदेव लोभे, जिल्हा सचिव वैभव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शहर रावसाहेब गंगाधरे, शहर सचिव महेश कांबळे,निलेश शेंडगे,वीर भगतसिंह विध्यार्थी परिषदचे नकुल भोईर,सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार,विशाल सरोदे संदीप नवसुपे जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पना गिड्डे ताई,वसंत पाटील,संतोष शिंदेअभिषेक गायकवाड,किरण खोत,प्रफुल्ल वाघमारे,जनार्दन देठे आदी जणांनी सहभाग घेतला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.