Alandi: आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज -आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित (Alandi)श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची यांच्या वतीने  19 फेब्रुवारी  रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षकेत्तर प्रतिनिधी शिवाजी जाधव तसेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Pimpri : पिंपरीत मुख्य अग्न‍िशमन केंद्र प्रबोधनी

 यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व शिवज्योतचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
 कार्यक्रमाप्रसंगी अहिल्या शिंदे, कपिल खुडे, यशवंती काढणे, आदेश साठे, तानाजी भागाये,  कार्तिकी कौदरे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर  संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, प्राचार्य दीपक मुंगसे, विकास शिवले यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, जीवन चरित्र तसेच संतांचे छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेले आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व इ. विषयांवर माहिती सांगितली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या राज्यगीताचे सामूहिकरीत्या गायन करण्यात आले. सूर्यकांत खुडे यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.