Talegaon Dabhade News: पं. जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्याविषयी अर्थपूर्ण विचार प्रकट करून लहान मुलांना चाॅकलेट व पेन देऊन कौतुक करून बालदिन साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनीत लहान मुलांना पेन आणि चॉकलेट देऊन कौतुक केले आणि ख-या अर्थाने बालदिन साजरा केला.

तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विधेयक कायद्याचा जाहीर निषेध केला.

केंद्र सरकारने सभागृहात चर्चेला न आणता अध्यादेश काढून जे कृषी विधेयक धोरण लागू करायचे ठरविले आहे, ते धोरण शेतक-यांना कसे त्रासदायक आहे, यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, माजी नगराध्यक्षा अॅड रंजना भोसले, तालुका युवक कार्याध्यक्ष  जितेंद्र खळदे, युवक अध्यक्ष विलास मालपोटे, अॅड राम शहाणे, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जम्मू काश्मिरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. आणि पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला.

या प्रसंगी विशाल वाळुंज, अस्लमभाई शेख, उत्तमशेट ओसवाल, नरेश अग्रवाल, विलास नांगरे, नारायण भेगडे, किसन भेगडे, शिवाजी काळोखे, सुर्यकांत बोराडे, प्रभाकर ओंकार, महेश खळदे, प्रताप हुंडेकरी, सचिन हाक्के, संकेत खळदे, प्रा. आनंद मोरे, विक्रांत वाळुंज, सागर वाळुंज, स्वप्नील साळवे, निनाद हारपुडे, लोमेश आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.