Talegaon Dabhade : पद्मभूषण वि. स. खांडेकर जीवनवादी भूमिकेमुळे अजरामर लेखक – डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज : वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके हे (Talegaon Dabhade) समकालीन लेखक; त्या काळामध्ये मराठी साहित्यावर अधिराज्य गाजवत होते. फडके हे कलावादी, तर खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून परिचित होते. खांडेकरांनी गोरगरीब, वंचित, मध्यमवर्गीय माणसाच्या दुःखासाठी लेखणी हाती घेतली. त्यांच्या या जीवनवादी भूमिकेमुळे ते अजरामर लेखक झाले, असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. शेजार ज्येष्ठ नागरिक संघाच्या शेजार वाचनालयात कै. वि. स. खांडेकर यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यामध्ये प्राचार्य मलघे बोलत होते.

याप्रसंगी दिगंबर भापकर, मधुकर ठकार, रमेश चंद्रात्रेय, ललीता जोशी, सुमित्रा तांबे, अमेय गुप्ते, विलास रानडे, श्रीधर दिक्षीत, नितीन पाडळकर, राजेंद्र गुर्जर आदी रसिक हजर होते.

यावेळी बोलताना डॉ. मलघे म्हणाले की, खांडेकरांनी गोरगरीब, वंचित, मध्यमवर्गीय वर्गाच्या खालच्या माणसाच्या दुःखासाठी लेखनी हाती घेतली आणि त्याच कुंचल्याने ययाती कादंबरी लिहिली आणि या कादंबरीला मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ययाती ही पौराणिक कादंबरी नसून ययाती नावाच्या व्यक्तीचे जीवन चरित्र आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत देखील माणसाचा लिंगपिपासू स्वभाव पाठ सोडत नाही. आजही समाजामध्ये अवतीभवती ययाती सारखे असंख्य लंपट लोक समाजाची दिशाभूल करत आहेत. या वास्तवतेचा परिपाक म्हणजे ययाती कादंबरी आहे. आणि म्हणूनच ती सर्वश्रेष्ठ ठरते असेही डाॅ. मलघे यांनी सांगितले.

खांडेकरांनी लिहिलेल्या अमृतवेल, उल्का, अश्रू, उ:शाप, दोन मने या कादंबऱ्या देखील मराठी कादंबरी विश्वात अधिराज्य गाजवणा-या आहेत. खांडेकरांच्या कथा, कविता, ललित निबंध, भाषणे, त्यांना मिळालेले साहित्य अकादमी, पद्मभूषण, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे सन्मान मराठी साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहेत, असेही डाॅ.  मलघे म्हणाले.

Today’s Horoscope 17 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

खांडेकरांबद्दल बोलताना श्रीकृष्ण पुरंदरे (Talegaon Dabhade) म्हणाले की, मराठी लेखनाचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. कादंबरी (16), कथासंग्रह, नाटक (22), आत्मकथन चरित्र (3), रुपकथा (6), लघुनिबंध (11), तसेच भाषणे, समीक्षा लेखन, संपादन, इत्यादी विपुल लेखन करून (52) पुस्तकांनी त्यांच्या प्रस्तावना दिल्या आहेत. खांडेकरांवर इतर मान्यवरांनी 35 पुस्तके लिहिली आहेत. खांडेकरांचे एकदा पुस्तक हातात घेतल्यावर पूर्ण वाचल्यावरच खाली ठेवावे लागते असे पुरंदरे म्हणाले.

सुरुवातीस खांडेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात झाली. उर्मिला बासरकर यांनी आभार मानले.

Chinchwad : नाट्यकलेची उर्मी घरातूनच – सतिश आळेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.