Today’s Horoscope 17 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 January 2023
वार – मंगळवार.
17.01.2023
शुभाशुभ विचार – 19 नंतर चांगला.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – विशाखा 18.46 पर्यंत नंतर अनुराधा.
चंद्र राशी – तुळ 13.00 पर्यंत नंतर वृश्चिक.
—————————————-
मेष (शुभ रंग- जांभळा)
महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. कोणतेही गैरव्यवहार टाळा. आज नीतीबाह्य वर्तन अंगाशी येऊ शकते. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्यायला हवी.

वृषभ (शुभ रंग – पिस्ता)
कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज काही येणी असतील तर ती अनपेक्षित रित्या वसूल होतील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

मिथुन (शुभ रंग – मोरपिशी)
हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वतःचे लाड पुरवण्यासाठी मनसोक्त पैसा खर्च कराल. कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील.

कर्क (शुभ रंग – मोरपीशी)
कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा आज तुमचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहिणी आज मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

सिंह (शुभ रंग- क्रीम)
शेजाऱ्यांशी क्षुल्लक करणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आज घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवायला हवा.

कन्या (शुभ रंग – पांढरा)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. जे मनी योजाल ते तडीस न्याल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

तूळ ( शुभ रंग – तांबडा )
आज वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला भाव मिळेल आज नेत्यांची भाषणे प्रभावी होतील.

वृश्चिक (शुभ रंग- भगवा)
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल.

धनु (शुभ रंग- गुलाबी )
जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. अति उत्साहात आज तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जातील. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

मकर (शुभ रंग- चंदेरी)
आज ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण असणार आहे. कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. अतिव्यस्त दिवस.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे तुमचे बेत असतील. आज सज्जनांचा सहवास लाभेल.

मीन (शुभ रंग – निळा)
हितशत्रू आज कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील कोणतेही धाडसाची कामे आज करू नका. सतर्क रहा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून प्या.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे 5 लाख रूपये किंमतीचा 25 किलो गांजा जप्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.