Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे 5 लाख रूपये किंमतीचा 25 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज : म्हाळुंगे परिसरातून एका आरोपीकडून (Mhalunge Crime) 5 लाख रूपये किंमतीचा 25 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्यावर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुन्ना नाहक रा चाकण मूळ रा. ओडीसा या आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस ऍक्ट कलम 8 (क), 20 (ब)(ii)(ब) अन्वये म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार विनायक कुमार चौबे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी एमआयडीसी हद्दीमध्ये बेकायदेशीर/ अवैध दारू, जुगार, मटका, गांजा व अन्य अशा धंद्यांवर  प्रभावी कारवाई करून सदर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते. (Mhalunge Crime) त्यानुसार म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी महाळुंगे पोलीस चौकीच्या तपास पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

Pune News : परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

त्यानुसार 15 जानेवारी 2023 रोजी पोलीस नाईक चाफळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की एक इसम खालुंब्रे परिसरात गांजा विक्री करण्याकरिता येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड व इतरांचे तपास पथक तयार केले.

त्यावेळेस संध्याकाळी सुमारे 5:30 वाजताच्या दरम्यान एक संशयीत ईसम त्या परिसरात आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने त्याचे नाव मुन्ना नाहक असे सांगितले व त्याच्या जवळील बॅग व गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 10 बॉक्स होते. (Mhalunge Crime) प्रत्येक बॉक्समध्ये 2.5 किलो गांजा असा एकूण 25 किलो गांजा किंमत अंदाजे 5 लाख रुपये मिळाला असून तो जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड व इतर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.