_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade: पार्थ पवार सोशल फाऊंडेशनतर्फे ‘ऑन ड्युटी’ पोलिसांच्या अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था

Talegaon Dabhade: Parth Pawar Social Foundation arranges snacks and meals for 'on duty' police

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थदादा पवार यांच्या सहकार्याने पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशन, उर्से टोल नाका, सोमाटणे फाटा टोल नाका, परंदवडी व वडगाव फाटा येथे बंदोबस्त ड्युटीवर असणाऱ्या सुमारे 85 पोलीस बांधवांच्या दररोजच्या नाष्टा व जेवणाची सोय करण्यात आली आहे. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

कोरोना विषाणूच्या साथीमुळे केंद्र व राज्य सरकारने मागील दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन केले आहे. तेव्हापासून पोलीस बांधव, डाॅक्टर, नर्स, सफाई कामगार आदीजण आप-आपल्या परीने कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अविरतपणे झटत आहेत. त्यांच्या नाश्ता व भोजनाची काळजी पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील विविध भागात 2500 लिटर सॅनिटाइजरचे वाटप करण्यात आले होते. सर्व पोलीस बांधव व अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पार्थ पवार यांचे आभार मानले तसेच पार्थदादा यांनी देखील नेहमीच सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.