Talegaon Dabhade : खंडणी दरोडा विरोधी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 12 जणांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथील राजगुरव कॉलनीमध्ये सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 29 हजारांचा ऐवज जप्त केला असून 12 जणांना अटक केली आहे. 

नवीन राजेंद्रप्रसाद गोयल (वय 31, रा. तळेगाव दाभाडे), कैलास चंद्र नायक (वय 45, रा. ओरिसा), मारुती चिमाजी मोरे (वय 60, रा. मुंबई), सूर्यकांत वासुदेव सातवसे (वय 61, रा. डोंबिवली), लक्ष्मीहार भगवान नाईक (वय 48, रा. ओरिसा), अशोक सियासरन लाल (वय 48, रा. गोरेगाव ईस्ट, मुंबई), हिरालाल बन्सीलाल गुप्ता (वय 62, रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई), आरीफखान चाँदखान इनामदार (वय 67, रा. भांडुप, मुंबई), गणेश दाजी ठोंबरे (वय 44, रा. सांगली), केशरीनाथ रामभाऊ म्हात्रे (वय 54, रा. पेन रायगड), सपन अभिमन्यू नायक (वय 42, रा. ओरिसा), मलप्पा शिवरुद्र वराळे (वय 61, रा. मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यांच्यासोबत महम्मद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), प्रकाश बटव (रा. मुंबई), गणेश कुल (रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे आशिष बनकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरव कॉलनी तळेगाव दाभाडे येथील एल शद्दाय बंगला येथे काहीजण मटक्याचा जुगार खेळत असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून 12 जणांना अटक केली. आरोपी जनता बाझार मटक्याच्या एजंटकडून मोबाईल फोनद्वारे बेटिंग घेत होते. पोलिसांनी या कारवाईमध्ये 27 मोबाईल फोन, मटक्याचे साहित्य असा एकूण 28 हजार 940 रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक हिवरकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.