Talegaon Dabhade : जोरदार पावसामुळे घराची कौले व लोखंडी अँगल कोसळला ; महिला जखमी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे परिसरात जोरदार पावसामुळे स्टेशन परिसरातील हरणेश्वरवाडी गवत बाजार येथे एका घराची कौले आणि लोखंडी अँगल कोसळला. या घटनेत घरातील महिला जखमी झाली. ही घटना शनिवार (दि. 10) रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही.

घटना घडली त्यावेळी घरात संजय चौरे, पत्नी मंगल चौरे आणि दोन मुली होत्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेत मंगल चौरे या किरकोळ जखमी झाल्या. मात्र या घटनेमध्ये चौरे यांच्या घराचे नुकसान झाले असून या घरात राहणे अशक्य आहे. त्यामुळे चौरे कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.