Talegaon Dabhade : ओग्नेबेनी इंडिया लि. कंपनीमधील कामगारांना 21 हजार 500 रुपयांची वेतनवाढ

एमपीसी न्यूज- नवलाख उंब्रे तळेगाव एमआयडीसी मधील ओग्नेबेनी इंडिया लि. मध्ये झालेल्या वेतनवाढ करारानुसार कंपनीमधील कायम कामगारांना दरमहा 21 हजार 500 रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. ओग्नेबेनी इंडिया लि. कंपनी व स्व. पै. विश्वनाथराव भेगडे माथाडी आणि जनरल कामगार युनियन यांच्यामध्ये करार झाला.

त्याचबरोबर एक वर्षाचा फरक म्हणून कामगारांना 2 लाख 40 हजार रुपये प्रत्यक्ष मिळाले. दिवाळी बोनस 35 हजार, मुदत विमा सतरा लाख, मृत्यू सहाय्य निधीसाठी संपूर्ण कामगारांचा एक दिवसाचा पगार, एकूण वार्षिक पगारी रजा 40 दिवस, गुणवंत कामगार पुरस्कार 10 हजार रु व दिवाळी गिफ्ट 2 हजार रु व वाढदिवस भेट म्हणून 1 हजार रू. व भेट वस्तु आदी देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले.

या करारावर राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, युनियनचे अध्यक्ष रवींद्र उर्फ लाहुमामा शेलार, सरचिटणीस बाळासाहेब झंजाड, खजिनदार शांताराम टकले, मावळ तालुका अध्यक्ष महेंद्र म्हाळसकर, युनियन कंपनी प्रतिनिधी रघुनाथ गोरड, संतोष मोहिते, संतोष पवार, पंडित हनुमंते, आदित्य किशोर व कंपनी व्यवस्थापनातर्फे एम.डी. साल्वो कार्गोनी, मनुष्यबळ विकास अधिकारी कविता कालिकर, निखिल पुजारा, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक उमेश पाटील अनिकेत निळेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कामगारांनी गुलाल उधळून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.