Talegaon Dabhade : इनरव्हील क्लबकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. याचा तळेगाव परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. अभ्यासिकेचे उदघाटन डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या हस्ते करण्यात आले.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी शैक्षणिक दृष्टिकोन ठेवत युपीएससी व एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी तळेगाव दाभाडे येथे स्टेशन विभागात असलेल्या इनरव्हील हॉलमध्ये अभ्यासिका (library) चालू करून मोठी सुवर्णसंधीच उपलब्ध करून दिली आहे.

या प्रसंगी अध्यक्षा वैशाली दाभाडे, प्रोजेक्ट (Talegaon Dabhade) चेअरमन हेमलता खळदे, निशा पवार, संध्या थोरात, अनुप्रिया खाडे, अर्चना देशमुख, अल्पना हुंडारे, जयश्री दाभाडे, उज्वला बागवे व सदस्य उपस्थित होते. यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल मंगल पवार, वैभवी कारके (पवार), आरती भोसले, पल्लवी शेवडे व प्रोजेक्ट चेअरमन हेमलता खळदे यांचे अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी विशेष आभार मानले.

Alandi News: आळंदी पोलिसांनी गोलेगाव हद्दीतील अवैध हातभट्टी दारुकेंद्र केले उद्ध्वस्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.