Alandi News: आळंदी पोलिसांनी गोलेगाव हद्दीतील अवैध हातभट्टी दारुकेंद्र केले उद्ध्वस्त

एमपीसी न्यूज : गोलेगाव (ता. खेड) परिसरात मागील काही महिन्यांपासून अवैध हातभट्टी दारू व्यवसाय फोफावला. त्यामुळे दारूच्या आहारी अनेक जण जात आहे.तेथील अवैध हातभट्टी दारू धंद्यावर कारवाई का होत नाही?असे अनेक स्थानिक ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत होते.असे वृत्त एका वृत्तपत्रातून प्रसारीत केले होते.

Chandrakant Patil : शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांतदादा म्हणाले…

त्या वृत्ताची दखल घेत आळंदी पोलिसांनी दि 10 रोजी अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्राच्या ठिकाणी धाड टाकली. पिंपळगाव – गोलेगाव हद्दीमधील पडीक असलेल्या शेतीमध्ये काटेरी झुडूपात गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन व साहीत्य पोलिसांना मिळून आले.ते सर्व रसायन व साहित्य पोलिसांनी जाळून नष्ट केले. पुढील कारवाई पोलीस करत आहे.याबाबत माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.