Chinchawad News:’…तर ज्या ज्या मंत्र्यांनी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य केलं, त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत’- मारुती भापकर

एमपीसी न्यूज : “छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या बाबत भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे नेते राज्यपाल त्यांच्या अकलेचे तारे तोडत आहेत त्यांचा अवमान होईल असे वक्तव्य करत आहेत. आम्ही 15 दिवसापासून वेगवेगळी आंदोलने करतोय. मात्र सरकार जागे व्हायला तयार नाही. एक दिवसाआड एक ते अशा प्रकारे महापुरुषांच्या विरोधात बोलत चालले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज या ठिकाणी कार्यक्रमाला आले असताना काही कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी लोकशाही पद्धतीने काळे झेंडे दाखवले. अशा प्रकारच्या आंदोलन केले.”

Chinchawad News : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या त्या तरुणाची ओळख पटली

“काही कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आम्ही त्यांना माफ करणार आहोत अशा प्रकारची भूमिका घेतली. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे अटक झालेले कार्यकर्ते पोलीस स्टेशन मध्ये असताना त्यांना बाहेर काढा आम्ही त्यांच्याकडे बघतो अशी धमकी देऊन गेले. आमचा म्हणणे आहे की त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांवर जर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार असाल तर ज्या ज्या मंत्रयांनी ज्यांनी ज्यांनी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य केलं त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि भाजपच्या गुंडांनी पोलीस स्टेशनमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत अन्यथा आम्ही हे आंदोलन अतिशय व्यापक आणि मोठे आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत,” असे बहुजन महापुरुष सम्मान समितीचे मारुती भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Pune News: चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानाविरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पैठण येथे कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे वादग्रस्त विधान केल्याने बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचा त्याचा विरोध करण्यासाठी बहुजन महापुरुष सम्मान समिती ने सकाळी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये धरणे आंदोलन केली आहे.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट आयोजित श्रीमन महान साधू मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील संध्याकाळी जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.