Chinchawad News : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या त्या तरुणाची ओळख पटली

एमपीसी न्युज: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आज पिंपरी चिंचवड शहरात शाईफेक करण्यात आली.

Chinchwad News: चिंचवडगावात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

शाई फेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. मनोज गरबडे असे या तरुणाचे नाव आहे. पिंपरी चिंचवड परिसरात तो आंबेडकर चळवळीची कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.

मनोज भास्कर गरबडे, धनंजय भाऊसाहेब बिजगज, विजय धर्मा ओव्हाळ अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या 8 ते 10 महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. शनिवारी सायंकाळी ते चिंचवड येथील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. तिथून उद्घाटन समारंभासाठी मोरया गोसावी मंदिराकडे जात असताना हा प्रकार घडला.

या प्रकरणानंतर पाटील समर्थक आणि समता सैनिक दल सामोरासमोर आले व त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भेट दिली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्यानंतर घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला. काही वेळेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील उद्घाटन समारंभासाठी पुढे मार्गस्थ झाले.
पैठण येथे चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून ही शाई फेक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी मनोज गरबडे याच्या पुढाकाराने संविधान जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. मनोज सह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.