“त्यांच्या बोलण्याचा आशय समजून घ्या” चंद्रकांत दादांवर झालेल्या शाईफेकीवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टीचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (शनिवारी) चिंचवडगावात कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री पाटील यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. सदर घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

 

Chinchawad News : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या त्या तरुणाची ओळख पटली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अतिशय दुर्दैवी अशाप्रकारची गोष्ट आहे. खरं म्हणजे त्यांच्या वाक्यातला एखादा शब्द चुकला असेल, तर त्या वाक्याचा आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे, की पूर्ण वाक्य दाखवून वाक्याचा आशय न दाखवता केवळ चुकलेल शब्द दाखवणं हे योग्य नाही. अर्थात मी काही माध्यमांना दोष देत नाही. पण मला असं वाटतं जे लोक अशा प्रकारचं कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत.

त्यांनी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे, त्याचा आशय समजून घेतला पाहिजे. जो खटकणार शब्द आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासाही केला आहे, माफीही मागितली आहे, सगळं केलं आहे त्यानंतरही अशाप्रकारे लक्ष्य करणं हे अतिशय चुकीचं आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.