Talegaon Dabhade : जिल्हा परिषद शाळेला आजोबांच्या स्मरणार्थ सुनील भोंगाडे यांच्यातर्फे व्यासपीठ

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषद शाळा भोयरे येथील प्राथमिक शाळेत कै ह भ प नामदेवराव भोंगाडे यांच्या स्मरणार्थ शाळेला व्यासपीठ बांधून देण्यात आले त्याचे लोकार्पण रविवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे यांच्या सौजन्याने सुमारे दोन लाख रुपये खर्चून व्यासपीठ बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन भामचंद्र डोंगर दिंडी अध्यक्ष ह-भ-प सोपानराव भोंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोयरे गावचे विद्यमान सरपंच बळीराम भोईरकर, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ सुनील भोंगडे यांचा सर्व मित्र परिवार, सर्व नातेवाईक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असताना आई वडिलांचे संस्कारातुन प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांसाठी भविष्यकाळात देखील अशा प्रकारचे चांगले करणार. मुले हीच आपल्या देशाचे भविष्य असल्याकारणाने त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन घडविण्याचे काम पालकांनी आणि शिक्षकांनी करावे त्यासाठी कुठल्याही प्रकारची लागणारी मदत केली जाईल असे आश्वासन सुनील भोंगाडे यांनी दिले. मुलांनी देखील चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या गावासाठी राज्यासाठी देशासाठी चांगले काम करावे अशी आशा ही व्यक्ती केली.

यावेळी भोयरे गावचे सरपंच बळीराम भोईरकर यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. भोयरे निगडे नाणवली वराळे सुदूंबरे इंदोरी जांभवडे अशा अनेक गावांमध्ये सुनील भोंगाडे यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी केलेल्या कामाची त्यांनी माहिती दिली. यावेळी शैक्षणिक, बौद्धिक व शारीरिक विभागांमध्ये पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी सरपंच बळीराम भोईरकर, पोलीस पाटील मंगेश आडिवळे, शालेय समितीचे अध्यक्ष गोरख जांभूळकर, माजी सरपंच काळुराम भोईरकर, उद्योजक भरत भोंगाडे, कैलास भोंगाडे, शरद भोंगाडे, विजय भोंगाडे, पांडा भोंगाडे, दत्ता भोंगाडे, अर्जुन शेळके, भूषण पिंपळे, शाळेचे मुख्याध्यापक इरणक सर, भोसले सर, केंद्रप्रमुख भांगरे सर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिंदेसर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.