Pune : संपूर्ण बीआरटी मार्गाचा आढावा घेतला जाणार – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील संपूर्ण बीआरटी मार्गाचा आढावा घेतला जाणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी सांगितले.

बीआरटी हे असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. काही ठिकाणी खूप अडचण होत आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. गुजरातमध्ये जी बीआरटी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात त्या ठिकाणी बीआरटी शहराबाहेर म्हणजेच 12 की. मी. अंतरावर केले जात आहे. हार्ट ऑफ सिटीत बीआरटी राबविताना खूप अडचण होत आहे.  शहरात औंध, हडपसर, सातारा रोड, आळंदी रोड परिसरात बीआरटी सुरू आहे तर, काही ठिकाणी राबविण्यात येणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ संस्थेशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.