Talegaon Dabhade : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर कोटींचे कर्जवाटप करणार

ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून ( Talegaon Dabhade) मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती व शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी सुमारे 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार असून त्यासाठी शासनाच्या व्याज अनुदानाचा फायदा शेतकरी बांधवांना देणार असल्याची माहिती बॅंकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी बांधवांना जे कर्ज दिले जाते त्या कर्जावरील व्याजासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व व्याजातील सुटही दिली जाते. शेतकरी बांधवांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, कृषी पायाभूत सुविधा निधी, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ व इतर अनुष॔गिक योजना आधीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून त्यांवरील व्याजासाठी मोठ्यावर अनुदान व व्याजातील सुटही दिली जाणार आहे.

शेतकरी बांधवांना शेतीबरोबरच, शेतीला पुरक असणारे जोडधंद्याला कर्जपुरवठा केला जाणार आहे.गाई, म्हैस, शेळ्या मेंढ्यापालन तसेच कुक्कुटपालन,यांत्रिकीकरण टॅक्टर व इतर शेतीयंत्र खरेदी करण्यासाठी  कर्ज पुरवठा केला जाणार आहे.
शेतक-यांना 10 लाख रुपयापासुन 40 लाख रूपयांपर्यत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. ही कर्जे 1 एप्रिल पासुन दिली जाणार आहेत. लाभार्थ्यानी नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या कर्ज विभागात संपर्क करावा असे आवाहन  बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी  केले आहे.
बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे शाखेत बॅंक वसुली अधिकारी, शाखा  अधिकारी यांची संयुक्त सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेला बॅंकेचे उपव्यवस्थापक संजय शितोळे, विभागिय अधिकारी गुलाब खांदवे, बॅंक वरीष्ठ अधिकारी धवलराज पवार, निलेश खोतसह बँक अधिकारी तसेच योगेश राक्षे, बाबुराव येवले, गणेश काजळे उपस्थित ( Talegaon Dabhade) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.