Talegaon Dabhade : शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज – युवराज काकडे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाला मार्गदर्शक आहेत. त्यांची प्रतिमा मनात बाळगत असताना त्यांचे विचार खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीने डोक्यात ठेवण्याची आवश्यकता आहे असे मत उद्योजक युवराज काकडे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या, इंद्रायणी महाविद्यालय, बी. फार्मसी व डी.फार्मसी  यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. संस्थेच्या विकास समितीचे सदस्य तसेच युवा उद्योजक, इंजिनियर युवराज काकडे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, बी.फार्मसी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल चोपडे, डी .फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.जी.एस शिंदे, वरिष्ठ विभागाचे प्रा. के .व्ही.अडसूळ, सांस्कृतिक विभागाचे प्रा.आर .आर. डोके प्रा. एस. पी. भोसले, प्रा. विद्या भेगडे आदी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=TkNke1Ng6sw

याप्रसंगी बोलताना युवराज काकडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाला मार्गदर्शक आहेत. त्यांची प्रतिमा मनात बाळगत असताना त्यांचे विचार खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीने डोक्यात ठेवण्याची आवश्यकता आहे . शिवकालीन  बंधारे, शेतीविषयक उपाययोजना, मॅनेजमेंट गुरु म्हणून असलेले योगदान,शेतसारा, रयतेचे सर्वांगीण कल्याण  या बाबींचा तरुण पिढीने आदर्श घेऊन त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजवले पाहिजे असे मतही काकडे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.आर. डोके यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा यानिमित्ताने आढावा घेतला. तसेच प्राचार्य चोपडे यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने फार्मसी महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहोचण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. डी. फार्मसीचे प्राचार्य शिंदे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले .प्रा. अडसूळ यांनी याप्रसंगी मनोगतात सांगितले की, शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते. त्यांनी जिंकलेल्या सर्व लढाया जिंकलेले गड किल्ले, युद्धनिती , रणनीती ,संघटन कौशल्य आणि गनिमी कावा, निधर्मी विचारसरणी  या बाबी आजच्या तरुणाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे हे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यकर्तृत्व भारत देशाप्रमाणे संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारे आहे.आज सगळ्या जगाची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून होताना दिसते. आजच्या काळात देखील शिवाजी महाराजांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य अविस्मरणीय आहे. जगातील अनेक विद्यापीठांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर अभ्यासक अभ्यास करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे असे डाॅ मलघे यांनी यावेळी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=F4t2TM2LO7k&t=3s

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ विकास समिती सदस्य यांनी  शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस .पी .भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.